Dr Siddharth Dhende | धाराशिव मधील वाघोलीतील पुरग्रस्तांना मदतीचा हात

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक कुटुंबांचे, जनावरांचे तसेच शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील दानशूर व्यक्ती, व्यापारी संघटना, डॉक्टर आणि केमिस्ट, पथारी संघटना, रिक्षा संघटना आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते पुढे येत सढळ हाताने मदतीसाठी धावून आले आहेत. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. धाराशिव जिल्ह्यातील वाघोली गावातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप केले.

या मदतीत तांदूळ, गहू, डाळी, बेसन, साखर, तेल, हळद, मसाले, मिठ, चहापत्ती, गोडा मसाला, शालेय साहित्य, कपडे, बिस्किटे आणि इतर गृहउपयोगी वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त वाघोली गावाला दत्तक घेऊन तेथील बाधित कुटुंबांना देण्यात आली.

“पुरामुळे मराठवाडामधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत देणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून अनेक नागरिक पुढे येत आहेत. प्रभाग क्रमांक दोन मधील दानशूर नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घेतला. त्याबद्दल त्याचे आणि सर्व संघटनांचे आभार.”

– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे.

Uncategorized
watersoftwares@gmail.com
मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित झालेल्या नागरिकांना न्याय देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी – डॉ सिद्धार्थ धेंडे

Dr Siddharth Dhende – मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे जिल्हाधिकारी

Read More »
Uncategorized
watersoftwares@gmail.com
चंद्रमानगर येथील नागरिकांना मिळणार हक्‍काचा निवारा – आमदार बापू पठारे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पाठपुरावा

Pune News – वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २ मधील चंद्रमानगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे अनेक वर्षांपासून रखडलेले घरांचे स्वप्न अखेर साकार

Read More »
Scroll to Top