डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रभाग क्रमांक दोन मधील खालील मनपा संबंधित समस्या करिता आज पाहणी दौरा केला .
१) आंबेडकर चौक हा सुशोभित करण्यासाठी प्रोजेक्ट डिझाईन करण्यात यावे.
चौका मधील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्प शेजारील मुतारी हलवण्यात यावी .
शिल्पामागे जो वराह मृत नंतर चा कचरा टाकला जातो त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे
२) अग्रसेन शाळा ते बार्टी चे कार्यालय मधील विकास आराखडा मधील २५० मिटर लांबी व १० मिटर रुंदी चा रस्त्या करिता प्रस्ताव राज्या शासना कडुन दिल्ली येथिल सर्वे आॅफ ईंडिया कडे तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा.
३) चंद्रमानगर येथिल घरां करिता जागा मा ना चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी राज्या कडुन मनपा ला हस्तांतरित करावी हा निर्णय घेतला आहे त्या करिता प्रस्ताव जिल्हाधिकारी मार्फत पाठविण्यात यावा.
४)बार्टी शाळे समोरील कचरा फीडर पाईंट हलवावे
५ ) डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे नियोजित जागेत सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करावे.
६) बंद पडलेली BRT काढून टाकावी या करिता प्रस्ताव सादर करावा .
७) मुळा नदी पात्रात राडारोडा टाकलेला त्यावर समिती गठित करुन अहवाल तैयार करावे व दोषींवर गुन्हे दाखल करावे.
८)नदिपात्र स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल
आजच्या पाहणी दौरा मधे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर , प्रोजेक्ट चे प्रमुख गोजारी साहेब , बांधकाम चे बुथकर साहेब , झोनल कमिशनर महादेव जगताप , येरवडा क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त गुर्रुम साहेब व ईतर अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौरा चे आयोजन मा उपमहापौर डाॅ धेंडे यांनी केले होते या ठिकाणी मंगेश गोळे , मा नगरसेवक अशोक कांबळे, भगवान जाधव , मा नगरसेविका नंदा कांबळे, निखिल गायकवाड, नानासाहेब नलावडे , गणेश बाबर , राहुल जाधव , नामदेवराव घाडगे ,सुधीर वाघमोडे, आसिफ शेख , राजेंद्र आल्हाट , निलेश माने, व ईतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.



